मळेवाड सरपंच, उपसरपंचांनी दिल्या डॉक्टरांना शुभेच्छा…

9
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०१: राष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि कृषी दिनानिमित्त गावागावात चांगली वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी कोरोना काळातही कौतुकास्पद काम केले आहे. याबद्दल मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत सरपंच मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांनी डॉ. गणपत टोपले, डॉ. आर. व्ही. कामत, डॉ. नमिता धुरी, डॉ. विद्याधर सावंत, डॉ. अदिती ठाकूर, डॉ. नागोरे या सर्व डॉक्टरांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या.

गावातील रुग्णांसाठी आपण अतिशय उत्तम रित्या वैद्यकीय सेवा देतअसून कोरोना काळातही आपण सर्व डॉक्टरनी कौतुकास्पद काम केलेले आहे. याबद्दल आम्ही ऋणी आहोत. अशी भावना उपसरपंच हेमंत मराठे यांनी व्यक्त केली.यावेळी कृषी दिनाच्या औचित्य साधून त्यांना सुपारीच रोपही भेट देण्यात आले.