खेळाकडे मनोरंजनाचे साधन म्हणून न पाहता त्यातून करिअर घडवा…

16
2
Google search engine
Google search engine

दयानंद गवस; सावंतवाडीतील एम क्रिकेट अकॅडमीचा सोहळा संपन्न…

बांदा,ता.०१: खेळामुळे शारिरीकदृष्टया तंदुरुस्त राहता येते. खेळातून उत्तम करिअरही करता येऊ शकते. त्यासाठी खेळाकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहू नका. खेळात सर्वोत्तम योगदान दिल्यास त्यातून चांगले करिअर घडू शकते, असे प्रतिपादन निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी केले. सावंतवाडी येथील एम क्रिकेट ॲकॅडमीचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर डॉ. कशाळीकर, डॉ. वझे, दयानंद गवस, ॲकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक, उपाध्यक्ष अक्रम खान, प्रशिक्षक राहुल रेगे उपस्थित होते.

ॲकॅडमीतर्फे तीन विभागात खेळाडूंना गौरविण्यात आले. परफॉरर्मर ऑफ दी इयर या पुरस्कारासाठी १२ वर्षांखालील गटात फरान आगा, उस्मा खान व भगवान पांढरे, १४ वर्षांखालील गटात निशांत शेटकर, १६ वर्षांखालील गटात सोहम पावसकर तर १ ९ वर्षांखालील गटात रघुवीर सातोसकर या सहा खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. इमर्जिंग खेळाडू म्हणून प्रसाद नाईक, सुहान बांदेकर, ओम मेस्त्री, तन्मय पाटणकर, यश पाटकर, पराग अराबेकर, साजिल खतीब, गौरांग निब्रे व पार्थ नर यांची निवड झाली. अकेडेमिक प्लेयर म्हणून नीरज जाधव व राजाराम गवस यांची निवड करण्यात आली.

सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. अध्यक्ष उदय नाईक यांनी अकॅडमीच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी जावेद खतीब, मनोज सातोसकर, उमेश कुबडे, उमेश पांढरे, श्री. दुधवडकर, श्री. कर्णिक, श्री. गगनराज, श्री. कोरगावकर, श्री पाटकर, सहाय्यक प्रशिक्षक अविनाश जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन सावंत तर आभार राहुल रेगे यांनी मानले. यावेळी ॲकॅडमीचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.