सावंतवाडी राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष कौस्तुभ नाईक मनसेत…

13
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.११: येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष कौस्तुभ नाईक यांनी मनविसेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. दरम्यान पक्षाशी एकनिष्ठ राहून सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आपण काम करणार असल्याचा विश्वास श्री. नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केला. तर श्री.नाईक यांच्याकडे लवकरच सावंतवाडीत नवीन जबाबदारी देणार असल्याचे श्री.उपरकर यांनी सांगितले.

यावेळी मनसे विध्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका सचिव राजेश टंगसाळी, गिरीश उपरकर, धनराज गोरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.