सावंतवाडीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातच आढळला नाग…

7
2
Google search engine
Google search engine

 

पोलीस वसाहतीतील घटना;सार्वजनिक बांधकामने दखल घेण्याची गरज…

सावंतवाडी,ता.११: येथील जीर्ण झालेली पोलीस वसाहत दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. आज तेथे राहणारे पोलीस कर्मचारी शहाजी बुरुड यांच्या घरात तब्बल तीन फुटी नाग सापडला. याबाबतची माहिती मिळताच सर्पमित्र नवीद हेरेकर यांनी त्याठिकाणी धाव घेत त्या नागाला पकडले. परंतु जीर्ण अवस्थेत असलेल्या या पोलिस वसाहतीचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम कडून कोणतीही साफसफाई अथवा डागडुजी केली जात नसल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत. त्याचा फायदा घेऊन सरपटणारे प्राणी पोलीस वसाहती मध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरात दिसतात. त्यामुळे याबाबत आता योग्य ती दखल घेण्यात यावी,अशी मागणी पोलीस कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.