एसटी चालक मारहाण प्रकरणी “त्या” पर्यटकाला न्यायालयीन कोठडी…

7
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१२: एसटी चालकाला मारहाण केल्याप्रकरणी बेळगाव येथील “त्या” पर्यटकाला न्यायालय कोठडी देण्यात आली आहे. माझ इलियास गोलंदाज (वय २२), असे त्याचे नाव आहे. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी आंबोली येथे घडला होता. दरम्यान संबंधित चालक विक्रम सुरेश पाटील (रा. गडहिंग्लज) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी संशयीतावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. तर त्याला काल न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चालकाने दिलेल्या तक्रार म्हटल्यानुसार एसटी बसमधून बाहेर खेचत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा प्रकार हा आंबोली घाटातील मुख्य धबधब्याच्या परिसरात घडला होता. दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले. तसेच संबंधित चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार येथील पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला न्यायालयाने काल एक दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. तर आज त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.