“साद फाऊंडेशन”च्या माध्यमातून उद्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान…

5
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.३१: कुडाळ नगरपंचायतच्या प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या साद फाऊंडेशनचा शुभारंभ उद्या १ ऑगस्टला होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी बजावणार्‍या मान्यवरांचा “समाज ऋणाई” पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे.

यात गटाविकास अधिकारी विजय चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक बापू खरात, कवी अजय कांडर, अभिनेते निलेश पवार, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. प्रशांत मडव, पत्रकार राजन चव्हाण, निवेदक व शिक्षण राजेश कदम, विस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग, सामाजिक कार्यकर्त्या अर्पिता मुंबरकर आदींचा समावेश आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन कणकवली विद्यामंदिर येथील महाराजा सभागृहात सायंकाळी साडे सहा वाजता होणार आहे. यावेळी सर्वानी उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.