कुडाळमध्ये निलेश राणेंच्या माध्यमातून “लाखाच्या” दहीहंडीचे आयोजन…

4
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.०८: येथील भाजपकडून माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून एक लाख रुपयांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दहीहंडी तारीख १९ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता कुडाळ सेल्फी पॉइंट गांधी चौक नजीक फोडण्यात येणार आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षक गोविंदा पथके आणि सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक पथकांना मानधन देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त गोविंदा पथकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपच्या वतीने शहराध्यक्ष राकेश कोदे यांनी केले आहे.