बांदा-शिरोडा मार्गावर तांबळघाटी येथे झाड पडून वाहतूक ठप्प…

5
2
Google search engine
Google search engine

शेर्ले ते मडुरा दरम्यानची घटना; सुनिल वेंगुर्लेकर यांनी रस्ता केला सुरळीत…

बांदा,ता.०९: पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनने अधिकच जोर धरला. बांदा-शिरोडा मार्गावरील शेर्ले ते मडुरा दरम्यान तांबळघाटी येथे रस्त्यावर झाड पडून वाहतूक ठप्प झाली होती. परंतु ग्रामस्थ सुनिल वेंगुर्लेकर यांनी श्रमदानातून सदर झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.
बांदा-शिरोडा मार्गावरील शेर्ले-तांबळघाटी येथे सकाळी अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले झाड मधोमध कोसळले. त्यादरम्यान वाहतूक सुरू नसल्याने अनर्थ टळला. परंतु प्रश्न एकच निर्माण होतो की वारंवार मागण्या करूनही रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली धोकादायक मोठी झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापही हटविण्यात आली नसल्याने वाहनचालक यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याच मार्गावर पाइपलाइनसाठी रस्त्याच्या बाजूला खोदाई करण्यात आलेल्या ठिकाणी केवळ मातीचा वापर करण्यात आला. मुळात सुस्थितीत असलेली साईडपट्टी धोकादायक बनवून प्रशासनास नेमका बळी घ्यायचा आहे काय असा सवाल वाहनचालकांमधून केला जात आहे. तसेच साईडपट्टीही निर्धोक करण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.