मालवणात काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

3
2
Google search engine
Google search engine

मालवण,ता.१३: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसच्या वतीने आज शहरात आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते.

काँग्रेसच्या वतीने क्रांती दिनी म्हणजेच ९ ऑगस्ट पासून १४ ऑगस्ट पर्यंत प्रत्येक तालुक्यात आजादी गौरव पदयात्रा काढण्यात येत आहे. या पदयात्रेची सुरुवात वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथून झाली. आज सकाळी ही पदयात्रा शहरातील देऊळवाडा येथून काढण्यात आली. पदयात्रेत तिरंगा डौलाने फडकत होता. त्याचबरोबर याद करो कुर्बानी असे लिहिलेल्या फलकावरील महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री अशा अनेक स्वातंत्र्य सेनानीच्या फोटोंमुळे स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणींना उजाळा मिळाला.

ही पदयात्रा शहरातील देऊळवाडा बसस्थानक भरड मार्गे बाजारपेठ फोवकांडा पिंपळ अशी काढण्यात आली. बाजारपेठेत सर्व व्यापाऱ्यांनी उभे राहत डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याला अभिवादन केले. पदयात्रेच्या निमित्ताने फोवकांडा पिंपळ येथे देशभक्तीपर नारे देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी उपस्थितांना संबोधित केले.

या पदयात्रेत काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, युवक काँग्रेसचे जिल्हाप्रवक्ते अरविंद मोंडकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, सेवा दल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, संदेश कोयंडे, आप्पा चव्हाण, सरदार ताजर, महेंद्र मांजरेकर, शहराध्यक्ष जेम्स फर्नांडिस, महिला शहराध्यक्ष गीता नेवाळे, शोभना चिंदरकर, चेतना होडवडेकर, सौ. सुर्वे, योगेश्वर कुर्ले, अमृत राऊळ, पप्पू माणगावकर, बाबा मेंडिस, लक्ष्मीकांत परुळेकर, गणेश पाडगावकर, हेमंत माळकर, श्रेयस माणगावकर, मधुकर लुडबे यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.