मालवणात मतदार ओळखपत्र आधार नंबर लिंक विशेष कक्ष स्थापन…

3
2
Google search engine
Google search engine

तहसील कार्यालय येथे १५ ऑगस्टला आयोजन ; नागरिकांनी मतदार ओळखपत्र, आधारकार्ड घेऊन येण्याचे आवाहन…

मालवण,ता.१३: येथील तहसील कार्यालय येथे १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे औचित्य साधून मतदार नागरिकांसाठी मतदार ओळखपत्राच्या तपशिलाशी आधार नंबर लिंक करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तरी तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रमास येणाऱ्या मतदार नागरिकांनी त्यांचे मतदार ओळखपत्र व आधारकार्ड घेऊन यावे असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे, निवडणूक नायब तहसीलदार नागेश शिंदे यांनी केले आहे.