निगुडे, शिर्ले व सोनुर्ली रस्त्यासाठी लक्ष्मण निगुडकर यांचे २९ ऑगस्टचे आंदोलन स्थगित…

3
2
Google search engine
Google search engine

बांदा ता. १९:  निगुडे, शिर्ले व सोनुर्ली रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ग्रामस्थ लक्ष्मण निगुडकर यांनी २९ ऑगस्टला पुकारलेले उपोषण तूर्तास स्थगित केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पावसाळा संपताच तात्काळ काम हाती घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, रस्त्यावरील मो-यांना पडलेले खड्डे बुजविणे. रस्त्याच्या साईड पट्टीवर बांध घालून पाण्याचा निचरा गटारात सोडणे. गटारांची साफसफाई करून पाण्याची विल्हेवाट लावणे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अनावश्यक झाडी तोडून रस्ता मोकळा करणे. रस्त्यावर दुरेकरवाडी, राणे वाडी, मधली वाडी,तेलवाडी, जि.प.शाळा न.१, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी स्पिडबेकर बसविणे. रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे, अशा विविध मागण्यांसाठी आपण २९ ऑगस्टला उपोषण जाहीर केले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी पावसाळा संपताच काम हाती घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मी तूर्तास स्थगित करत आहे.