ज्येष्ठ व्यापारी आप्पा सापळे यांचे निधन…

7
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.२५: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कणकवली शहरातील प्रसिद्ध व ज्येष्ठ व्यापारी व कणकवली बाजारपेठ येथील रहिवासी श्रीकृष्ण राजाराम उर्फ आप्पा सापळे (वय ७१) यांचे आज गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पहाटेच्या सुमारास कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची निधन झाले. कणकवली शहरातील जुने किराणा मालाचे व्यापारी म्हणून ते अवघ्या जिल्ह्यात प्रसिद्ध होते. कणकवली तालुका व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांच्यावर आज सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात, पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, भाऊ दत्ता सापळे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.