बांद्यातील दूध उत्पादक संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप…

8
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.२७:येथील बांदेश्वर दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने संस्थेला नियमित दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी निमित्त गृहपयोगी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण गावडे, बांदा सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, डिंगणे सरपंच जय सावंत, संस्थेचे उपाध्यक्ष बाळा आकेरकर, सचिव मनोज सावंत, संचालक रत्नाकर आगलावे, बाळा बहिरे, सुनील धामापुरकर, सुभाष तोरसकर यांच्यासह संस्थेचे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने ६५ शेतकऱ्यांना गृहयोगोपयोगी वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.