अत्याचार आरोपातून पुतण्या निर्दोष…

3
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.३: पणदूर (कुडाळ) येथील अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अमोल जाधव याची ओरोस येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ॲड. प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले.

याची हकिकत अशी की, फिर्यादी महिलेने आपल्यावर चुलत पुतण्याकडून अत्याचार झाल्याच्या घटनेची फिर्याद कुडाळ पोलीस स्टेशनला दिली. या फिर्यादीमध्ये संशयित आरोपी अमोल जाधव याने आपल्यावर अत्याचार केला असल्याचे नमूद करण्यात आले होते. सदर फिर्यादीवरून संशयित आरोपी अमोल जाधव याच्या विरुद्ध कुडाळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजि नं ३०८/२०२१ दाखल करण्यात आला होता. यामध्ये संशयित आरोपी अमोल जाधव याने २४ डिसेंबर २०२१ रोजी फिर्यादी महिलेच्या घरात जाऊन बलात्कार केला. अशा आशयाची फिर्याद नोंद करण्यात आली.

सदर फिर्यादी वरून संशयित आरोपी अमोल जाधव याच्या विरुद्ध भा. दं. वी कलम ३७६,३५४,३५४ अ २, ४५२, ५०६ अन्वये न्यायालयात दोषारोप ठेवण्यात आला होता. सदरचा खटला ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे कोर्टात चालला. सदर केस मध्ये एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीमधील विसंगती तसेच सबळ पुराव्याचा अभाव त्याचबरोबर फिर्याद देण्यास झालेल्या विलंबाचे कोणतेही समर्पक कारण नसणे आदी गोष्टी लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी अमोल जाधव याची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अॅड. प्राजक्ता शिंदे यांनी युक्तिवाद केला.