सावंतवाडी तालुक्यात अवैद्य धंद्यांना आळा घालण्याबरोबरच कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवा…

3
2
Google search engine
Google search engine

शहर मनसेची मागणी; पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे स्वागत करत निवेदन सादर…

सावंतवाडी,ता.१०: तालुक्यातील अवैध धंद्यांना आळा बसण्यासाठी पोलिस प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम हाती घ्यावी, तसेच कायदा-सुव्यवस्था सुरळीत राहण्याकरिता प्रयत्न केले जावेत, अशी मागणी येथील मनसेच्या वतीने पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान सोनुर्ली येथील श्री देवी माऊली मंदिरात चोरी करणारे चोरटे अद्याप मोकाट आहेत. त्यांना लवकरात-लवकर गजाआड करण्यासाठी तपासाला गती द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली श्री. मेंगडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच त्यांचे स्वागतही केले.
यावेळी उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक, सचिव कौस्तुभ नाईक, मनविसे तालुकाध्यक्ष ओंकार कुडतरकर, मुकुंद धारगळकर, प्रवीण गवस, सर्वेश तेली, आदित्य कुडतरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. सुभेदार यांनी तालुक्यातील तेजीत असलेल्या अवैध धंदयावर कडक करावाई पोलिस प्रशासनाकडून केली जावी. शहरात सध्या चोऱ्या, घरफोड्याचे प्रमाण वाढले आहे. त्या दृष्टीने रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्ती पथकात वाढ केली जावी. सोनुर्ली येथील श्री देवी माऊली मंदिरात चोरी होऊन सोळा दिवस पूर्ण होत आले तरी चोरीचा छडा लागलेला नाही. चोरी करणारे चोरटे अद्याप मोकाट फिरत आहेत. त्यांना तातडीने अटक केली जावी. या मंदिरात चोरी होणे म्हणजे असंख्य भाविकांच्या भावनेला ठेच पोहचवण्यासारखे आहे. त्यामुळे पोलिस प्रशांसनाने या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करावा अशी मागणी केली. यावर श्री. मेंगडे यांनी तालुक्यातील अवैध धंद्यांना आवर घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जावे. सोनूर्ली माऊली मंदिर चोरी प्रकरणी तपास सुरु आहे. शहरात रात्रीच्या वेळी चार पोलिसांचे गस्ती पथक तैनात करण्यात आली आहेत, असे सांगितले.