टेम्पो चालकांच्या दणक्यानंतर “तो” खड्डा पालिकेने तात्काळ बुजविला…

4
2
Google search engine
Google search engine

वृक्षारोपण केल्यानंतर प्रशासनाला जाग; तात्काळ खड्डा बुजविण्याच्या पोलिसांच्या पालिकेला सुचना…

सावंतवाडी,ता.१५: खड्ड्याच्या त्रासामुळे आक्रमक झालेल्या टेम्पो चालकांनी रस्त्यावर वृक्षारोपण केल्यानंतर याची तात्काळ पालिका प्रशासाने दखल घेत दगड व माती टाकुन तात्काळ तो खड्डा बुजविला. दरम्यान पालिकेला पोलिसांकडुन तशा सुचना करण्यात आल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात आले. मात्र आंदोलनानंतर तात्काळ खड्डा बुजविण्यात आल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले.

येथील पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या टेम्पो स्टॅण्डच्या समोर मोठा खड्डा पडला होता. याबाबत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून सुध्दा कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आक्रमक झालेल्या टेम्पो चालकांनी त्या ठिकाणी वृक्षारोपण केले. हे आंदोलन झाल्यानंतर त्याठिकाणी पोलिस अधिकारी दाखल झाले. दरम्यान वस्तुस्थिती लक्षात घेवून त्यांनी पालिकेेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. तसेच लोकांची भावना लक्षात घेता तात्काळ खड्डे बुजवा, अशा सुचना केल्या. त्यानुसार तात्काळ हे खड्डे बुजविण्यात आले. याबाबतची माहिती पालिकेचे बांधकाम अभियंता मनोज राऊळ यांनी दिली.