व्यायामाचे साहित्य अन्यत्र हलवून आणखी २५ लाख उकळायचे होते का?

14
2
Google search engine
Google search engine

धोंडी चिंदरकर ; आमदार सध्या कोणाशी बैठका घेताहेत ते पहा, अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल…

मालवण,ता.१७ : पालिकेच्या व्यायामशाळेतील साहित्य जर निकृष्ट दर्जाचे होते मग आमदार वैभव नाईक यांनी त्याचे लोकार्पण का केले. त्यांना हे साहित्य अन्य ठिकाणी हलवून आणखी एक उदघाटन दाखवून आणखी २५ लाख उकळायचे होते का? असा प्रश्न भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी उपस्थित करत याचे उत्तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी द्यावे असे म्हटले आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी माजी खासदार निलेश राणेंवर केलेल्या टीकेला श्री. चिंदरकर यांनी पत्रकातून उत्तर दिले आहे. ते म्हणाले, व्यायामशाळेतील साहित्य जर निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले मग आमदारांनी त्याचे लोकार्पण का केले. हे साहित्य त्यांना अन्य ठिकाणी हलवून आणखी एक उदघाटन दाखवायचे होते का? राहिला प्रश्न प्रशासकीय ज्ञानाचा. प्रशासकीय ज्ञानावर कोण बोलत? की ज्यांना सत्ता मिळाल्यावर कशा कशासाठी राबवयची ते समजत नव्हतं. फक्त निकृष्ट दर्जाची कामे करून फक्त सत्तेचा वापर स्वतःसाठी करायचा एवढंच माहित असलेल्यांनी प्रशासनातील गोष्टी आम्हाला शिकवू नयेत. राहिला प्रश्न देवबाग, तळाशील बंधाऱ्याचा. क्रोसेक्शन सर्वेसाठी आम्ही आवाज उठविल्यानंतर ते पैसे भरले. तो सर्वे करण्यासाठी काय पाठपुरावा केला होता का? याचे ज्ञान नाही आणि प्रशासनाच्या गोष्टीवर तुम्ही बोलणे म्हणजे एक प्रकारचा विनोदच आहे. जो पर्यंत क्रोसेक्शन सर्वे होत नाही तो पर्यंत ते काम होत नाही हे सुद्धा माहित नाही? राहिला प्रश्न देवबाग बांधाऱ्याचा तर त्यासाठी नारायण राणे यांनी १ कोटी रुपयांचा निधी दिला. तो सत्तेचा गैरवापर करून आपली मते विरोधात जाण्याच्या धास्तीने तिकडे कोलदांडा घालण्याच काम कोणी केले त्याच उत्तर द्यावं.
आज रस्त्यांची दुरवस्था झाली आहे त्याला जबाबदार कोण? तुमच्या सत्तेच्या कारकिर्दीत केलेले रस्ते एका वर्षात निखळून पडले. जिओ ट्यूब वाहून गेले. अरे कुठें कुठें भ्रष्टाचार करायचा ठेवलात? तेव्हा आता शांत बसा. प्रशासन कस पळवायचं ते तुमच्याकडून धडे घ्यायची गरज नाही. पण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना माझी विनंती वजा सूचना तुम्ही जास्त तावातावात भांडू नका. तुमचे आमदार कोणाकोणाशी सध्या बैठका घेत आहेत त्याची माहिती घ्या. अन्यथा मग उगाच पश्चाताप करत बसणार. सत्ता भाजप व अधिकृत सेनेची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता शांतच बसावे असेही श्री. चिंदरकर यांनी म्हटले आहे.