सावंतवाडीत भाजपाकडून सेवा पंधरवड्या निमित्त विविध सेवाभावी उपक्रम…

7
2
Google search engine
Google search engine

अजय गोंदावळे; रक्तदान, आरोग्य शिबिरासह उद्योजकांच्या चर्चा सत्राचे आयोजन…

सावंतवाडी,ता.१७: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपाच्या वतीने “सेवा पंधरवडा” हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत रक्तदान, आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरासह शहरातील नामांकित उद्योजकांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी आज येथे दिले. दरम्यान हे उपक्रम २०, २१ आणि २२ सप्टेंबरला येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत. तरी जास्तीत-जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याबाबत श्री. गोंदवळे यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणी बंटी पुरोहित, सावंतवाडी स्पोर्ट क्लब अध्यक्ष निशांत तोरस्कर आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, सेवा पंधरवडा या उपक्रमा अंतर्गत शहरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यात २० सप्टेंबरला मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त ७२ जण रक्तदान करणार आहेत. २१ सप्टेंबरला मोफत आरोग्य व नेत्रतपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. तर नेत्र तपासणी शिबिरात नाममात्र शुल्क आकारून चष्म्यांचे वाटप सुद्धा करण्यात येणार आहे. तसेच २२ सप्टेंबरला शहरातील नामांकित उद्योजकांचे युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी चर्चासत्र घेण्यात येणार आहे. तरी जास्तीतजास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.