शांतता प्रिय सावंतवाडी शहरात राडा संस्कृती नको…

10
2
Google search engine
Google search engine

बबन साळगावकरांच्या कानपिचक्या; तो सलाम तुम्हाला नाही तर तुमच्या पदाला…

सावंतवाडी,ता.१८: शांतता प्रिय सावंतवाडी शहरात राडा संस्कृती नको, सामाजिक आणि राजकीय सलोखा राखण्यासाठी येथील राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, अशा कानपिचक्या सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिल्या आहेत. दरम्यान काल झालेली घटना ही शहराच्या सुसंस्कृतपणाला तडा देणारी आहे. लोक तुम्हाला सलाम करत नसून तुमच्या पदाला सलाम करतात याचे प्रत्येकाने भान ठेवावे, असेही त्यांनी म्हटले आहे. काल येथील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना कार्यालयात घुसून मनसेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली होती. किरकोळ कारणातून हा प्रकार घडला होता. यानंतर श्री. साळगावकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रक असे म्हटले आहे की,…