देवमाशाच्या उलटीची तस्करी केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल…

6
2
Google search engine
Google search engine

देवगड,ता.२३: तब्बल बावीस कोटी रुपयाच्या देवमाशाच्या उलटीची तस्करी केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. उद्या त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अमोल विजय लोके (रा. मिठबाव), आप्पा रघुनाथ नेसवणकर (रा. मिठमुंबरी), दिनेश महादेव आचरेकर (रा.साळेल-मालवण), भिकाजी वसंत जेठे (रा. आरे-देवगड), मिनल जयदीप तळगावकर (रा.खारेपाटण-कणकवली), माधवी ज्ञानेश्वर दळवी (रा. फोंडाघाट) अशी त्याची नावे आहे. याबाबतची तक्रार सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे हवालदार संकेत खाडे यांनी दिली. त्यानुसार वन्यजीव अधिनियमानुसार देवगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ते नेमके तस्करी करण्यात आलेली उलटी कोणाकडे देणार होते?तसेच त्यामागे नेमका कोण आहे? याचा शोध घेण्यात येणार आहे, अशी माहिती देवगड पोलिस ठाण्याचे हवालदार उदय शिरगावकर यांनी दिली.