सावंतवाडीत उद्या मोदींच्या कार्याची माहिती देणार्‍या चित्रप्रदर्शनाचे आयोजन…

2
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात उद्या शनिवार २४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता मोदी यांच्या कामाची माहिती देणारे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवडा या उपक्रमाच्या निमित्ताने हे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन शहराध्यक्ष अजय गोंदावळे व माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.