कुडाळात रिक्षा व कारमध्ये अपघात, चौघे जखमी…

10
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.०८: येथे वेताळ-बांबार्डे पुलानजीक कार व रिक्षात अपघात झाला. यात चौघे जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याचा सुमारास घडली. त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली येथील रिक्षा चालक दिनेश राणे हे आपल्या रिक्षाने जानवली ते पिंगुळी असा प्रवास करीत होते. यावेळी मागून येणार्‍या कार चालकाने त्यांच्या रिक्षाला धडक दिली आहे. यात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात घडल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणी असलेले प्रवासी आणि वाहनधारक त्यांच्या मदतीसाठी धावले. व रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.