सावंतवाडीची सांस्कृतिक पंरपरा टिकविणार्‍या नाट्य कलाकार, साहित्यिकांचे भव्य स्मारक व्हावे…

6
2
Google search engine
Google search engine

कोमसापच्या बैठकीत निर्णय; केशवसूत कट्ट्याला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी ठराव…

सावंतवाडी,ता.१०: साहित्य आणि सांस्कृतिक पंरपरा टिकविणार्‍या सावंतवाडीतील साहित्यीक नाट्य कलाकार या क्षेत्रातील व्यक्तींचे भव्य स्मारक व्हावे, आणि केशवसूत कट्ट्याला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय सावंतवाडी कोमसापच्या बैठकीत घेण्यात आला. कोजागिरी पौणिमेचे औचित्य साधून नुकतीच केशवसूत कट्ट्यावर ही बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष संतोष सावंत यांनी एकमताने हा निर्णय घेतला.

सावंतवाडी शहरातील केशवसुत कट्ट्यावर कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त “साहित्याची कोजागिरी पौर्णिमा” असा अनोखा कार्यक्रम प्रथमच केशवसुत कट्ट्यावर घेण्यात आला. यावेळी कोमसापचे अध्यक्ष श्री. सावंत यांनी साहित्य कला संगीत क्रीडा चळवळ कायम राहावी यासाठी अनेक उपक्रम घेतले जात आहेत. सावंतवाडी शहरात केशवसुत कट्टा उभारण्यात आला आहे. मात्र या कट्ट्याला कवी केशवसुत यांचे भव्य स्मारक असा दर्जा मिळणे आवश्यक आहे अनेक दिग्गज साहित्यिक कवी वसंत सावंत आदी साहित्यिकांचे भव्य दिव्य स्मारक रुपी आठवण या शहरात उभे राहावे यासाठी शासनाकडे तसा ठराव आपण सर्वांनी पाठवूया असे स्पष्ट करत आजच्या या कार्यक्रमा निमित्ताने तसा ठरावही घेण्यात आला. या कार्यक्रमात काव्यरंग अनेक कवींनी आपल्या बहारदार कवितांचे सादरीकरण केले.

कवयित्री मंगल नाईक-जोशी यांनी कोजागरी पौर्णिमेचे अध्यात्मिक व शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्व काव्यमय पद्धतीने सादर केले. त्यानंतर कवी दीपक पटेकर यांनी आपल्या कवितेतून कोजागरी पौर्णिमेचा जागर विशद केला. मेघना राऊळ यांनी उत्कृष्टरित्या भावगीत सादर केले तर कोमसापच्या सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी आपल्या गीत गायनातून रसिकांची मने जिंकली. माजी जिल्हाध्यक्ष प्रा. ॲड. अरुण पणदूरकर यांनी जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या कार्याविषयी माहिती देत आपली कविता सादर केली. प्रा. रुपेश पाटील यांनीही आजच्या परिस्थितीवर आधारित कविता गायन केले. संतोष पवार यांनीही बालकविता सादर केली. प्रज्ञा मातोंडकर, विनायक गांवस यांनीही आपल्या कवितेतून कोजागरी काव्य संमेलनात रंग भरले. सहसचिव राजू तावडे यांनी आपल्या विनोदी शैलीने गजाल सादर केली. कोमसापचे माजी अध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर यांनी अखिल भारतीय ग्राहक मंच विषयी माहिती दिली. तर कोमसाप सावंतवाडी तालुका अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी कोजागरी पौर्णिमेची कविता सादर केली. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर घारपुरे यांची मोती तलावावरील कविता ही सादर करण्यात आली. उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी केशवसुत कट्ट्याला एक दर्जा मिळणे आवश्यक आहे तसेच सर्व साहित्यिकांचे स्मारक उभारण्याच्या ठरावाला अनुमोदन दिले.

यावेळी कार्यक्रमास केंद्र प्रमुख म. ल. देसाई, गणेश घाडी आधी उपस्थित होते. दरम्यान बाल हक्क संरक्षण कायदा यावर जिल्हा सदस्यपदी ॲड. अरुण पणदूरकर व बाळूमामा मालिकेत कलाकार म्हणून प्रतिभा चव्हाण, घटनादुरुस्ती समितीचे अध्यक्षपदी अभिमन्यू लोंढे, प्राध्यापक सुभाष गोवेकर आदींचे अभिनंदन करण्यात आले.