नियमित कर्ज वसुलीचे धोरण राबवल्यास सोसायट्या सक्षम राहतील….

5
2
Google search engine
Google search engine

मनिष दळवी; शंभर टक्के कर्जाची परतफेड करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मान…

देवगड,ता.१०: विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटयांनी प्रत्येक दिवशी कर्जवसुलीचे धोरण ठरवुन आपली संस्था कशी सक्षम होईल या दृष्टीकोनातून वाटचाल संस्था संचालकांनी केले पाहिजे. या सोसायटयांना जिल्हा बँक वेळोवेळी सहकार्य करुन शेतक-यांचे हितही जोपासत असल्याचे मत मनिष दळवी यांनी जामसंडे येथील सांस्कृतिक भवन मध्ये व्यक्त केले.

तालुक्यातील काही विकास संस्थांनी ३० जून २०२२ अखेरी वसुल पात्र बँक कर्जाची १०० टक्के पुर्णपणे परतफेड केलेल्या प्राथमिक विविध सहकारी संस्थांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा बँकेचे संचालक ॲड.प्रकाश बोडस,समिर सावंत, प्रज्ञा ढवन,बँकेचे सीईओ,प्रमोद गावडे,प्रकाश राणे,संदिप साटम,रवि पाळेकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले की, देवगड तालुक्यामध्ये ३४ विविध सहकारी सोसायटया आहेत. यामधील जिल्हयामधील सर्वाधिक ५ कोटीची उलाढाल करणारी संस्था हि या तालुक्यात आहे. तर ० टक्के वसुली असलेलीही विकास सोसायटी या तालुक्यात आहे. यामुळे या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती व आर्थिक परिस्थिती समसमान असताना ५ कोटीची उलाढाल करणा-या विकास सोसायटयांप्रमाणे ईतर सोसायटयांनी देखील काम केले पाहिजे. या सोसायटयांना बळ देण्यासाठी या सोसायटयांच्या माध्यमातून शेतक-यांचे हित जोपासण्यासाठी जिल्हा बँक नेहमीच प्रयत्न करीत आहे. यामुळे येथील शेतक-यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांचा विकास साधण्यासाठी नेहमीच आपण प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. विकास संस्था या त्या त्या गावामधील शेतक-यांचे हित जोपासणारे केंद्र बिंदु आहे. यामुळे या संस्था तोटयामध्ये जाता कामा नये यासाठी संस्थाचालकांनी विकास संस्था टिकविण्यासाठी आत्मियतेने प्रयत्न केले पाहिजे. कर्ज वसुली हेच मोठे एकमेव काम विकास संस्था पुढे येण्यासाठी महत्वाचे असते. यासाठी सर्व सोसायटयांनी आपले लक्ष कर्जवसुलीकडे दयावे असे त्यांनी सांगितले.
चौकडमध्ये घेणे- ॲड.प्रकश बोडस
विविध कार्यकारी सहकारी सोसायटयांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा बँक नेहमीच तत्पर असते. या सोसायटयांनी कर्जवसुलीवरती विशेष महत्व दिले पाहिजे. तसेच थकबाकी दारांवरती 101 ची कारवाई केली पाहिजे. यामुळे कर्जवसुली होत असते. या विकास सोसायटयांनी आपली संस्था जास्तीत जास्त नफयामध्ये येण्यासाठी उलाढाल वाढविली पाहिजे. तसेच येथील शेतक-यांसाठी जुन महिन्यामध्ये लागणारा युरिया व मिश्र खताची मागणी सोसायटयांनी डिसेंबर जानेवारी महिन्यामध्येच केली पाहिजे. त्यासाठी जिल्हा बँकेकडे कॅश क्रेडिटची मागणीही यासाठी लवकरच केली पाहिजे. तरच शेतक-यांना वेळीच खत उपलब्ध करुन देता येतो हि बाब संस्था चालकांनी लक्षात घेतली पाहिजे. असे मत ॲड.प्रकाश बोडस यांनी मांडले.
यावेळी 30 जुन 2022 अखेरीस वसुलासह पात्र बँक कर्जाची 100 टक्के पुर्ण फेड केलेल्या देवगड तालुक्यातील पडेल,किंजवडे,महाळुंगे,नाडण,कुणकेश्वर,वेळगिवे,मुणगे,मोंड या विविध सहकारी सेवा संस्थांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आला.