सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिंदे गटात…

8
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता.११: जिल्ह्यातील तीन उपजिल्हा प्रमुखांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज शिंदे गटात प्रवेश केला. यात शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सचिन देसाई, सुनील दुबळे यांसह होडवडा शाखा प्रमुख कल्पेश मुळीक यांचा समावेश आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, शिंदे गट वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, वेंगुर्ला शहर प्रमुख सचिन वालावलकर, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते.

या तिघांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची अर्थात “बाळासाहेबांची शिवसेना” या पक्षाचे मजबुतीकरण सिंधुदुर्गात होण्यास मदत होणार आहे