मालवणात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पेटविल्या मशाली…

9
2
Google search engine
Google search engine

खोक्याचे दहन; शिंदे गटाचा अनोख्या पद्धतीने निषेध…

मालवण, ता. ११ : येथील शिवसेना शाखा येथे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करत मशाली पेटविण्यात आल्या. त्यानंतर खोकासुर आणि गद्दार उल्लेख असलेल्या खोक्याचे दहन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार ओरसकर, नितीन वाळके, उमेश मांजरेकर, अमेय देसाई, सन्मेष परब, बंड्या सरमळकर, नरेश हुले, दीपक देसाई, प्रसाद आडवणकर, सुरेश मडये, दत्ता पोईपकर यांच्यासह अन्य शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.