सिंधुदुर्गातील कलाकारांची निर्मिती असलेला “प्रेमशल्य” लघुपट प्रदर्शित…

7
2
Google search engine
Google search engine

“ओरान फिल्म” यूट्यूब चॅनलवर पाहण्याची संधी; अनिल सरमळकर यांची कल्पना…

सावंतवाडी,ता.१२: येथील कवी, लेखक, नाटककार, दिग्दर्शक अशा विविध अंगी भूमिका बजावणाऱ्या अनिल सरमळकर यांनी “ओरान फिल्म” प्रोडक्शनच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवर “प्रेमशल्य” हा लघुपट प्रदर्शित केला आहे. हा लघुपट नवोदित लेखिका गौरी धुरी यांच्या “मुस्कान” या कथेवर आधारित असून याची पटकथा आणि संगीत अशी दुहेरी भूमिका प्रताप तांबुळकर यांनी सांभाळली आहे. तर शशांक परब, श्रध्दा नाईक, मंदार जंगम, गौतमी तारी, नितिल नाईक, अक्षय सावंत आदींनी या लघुचित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तरी स्थानिक आणि होतकरू कलाकारांची निर्मिती असलेल्या हा लघुपट जास्तीत-जास्त रसिकांनी पहावा, असे आवाहन श्री. सरमळकर यांनी केले आहे.

या लघुचित्रपटाचे चित्रीकरण सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अत्यंत निसर्गरम्य अशा गावात करण्यात आले आहे. यावेळी स्थानिक कलाकार आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, असे या लघुचित्रपटाचे सादरकर्ते श्री. सरमळकर यांनी सांगितले.

प्रेमशल्य या लघुचित्रपटाची कथाकार पटकथाकार तंत्रज्ञ आणि कलाकारही सर्वजण नवोदित आहेत. या सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या निभावल्या असुन ही कथा प्रेमकथा असुन त्यामधुन आजच्या नव्या पिढीला काही एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर हा लघु ओरान या यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित झाला आहे.