कणकवली पंचायत समितीच्या वतीने सरपंचांचा सत्कार..

6
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.१२: विविध स्तरावर यश मिळवलेल्या कणकवली तालुक्यातील असलदे, साकेडी व कोळोशी सरपंचांचा सत्‍कार आज कणकवली पंचायत समितीच्यावतीने करण्यात आला. येथील भगवती मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

राष्‍ट्रीय ग्रामीण विकास फांऊडेशनचा आदर्श सरपंच पुरस्कार असलदे गावचे सरपंच गुरुप्रसाद वायंगणकर यांना जाहीर झाला. त्‍याबद्दल कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी सरपंच श्री.वायंगणकर यांचा सत्कार केला. तर स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त साकेडी सरपंच रीना राणे, कोळोशी सरपंच ऋतिका सावंत या सरपंच प्रशिक्षण पुणे येथील मार्गदर्शन कार्यक्रमाला गेल्याबद्दल त्‍यांचाही सत्‍कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, आर. एल.शिंदे, आमचा गाव आमचा विकास प्रशिक्षक पंढरीनाथ माणगावकर , श्रीमती रितू पांचाळ, अधीक्षक श्री .परब , वरिष्ठ सहाय्यक देविदास आडबे, श्रीमती पोकळे ,कनिष्ठ सहाय्यक उपस्थित होते.