युवा नेते विशाल परबांचा वाढदिवस आज कुडाळ मध्ये साजरा होणार…

9
2
Google search engine
Google search engine

राणेंसह शहाजी पाटीलांची उपस्थिती; कडकडे, चैतन्य महाराजांसह पोवाड्याचा कार्यक्रम.

कुडाळ,ता.१५: येथील भाजपाचे युवा नेते तथा हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांचा वाढदिवस आज कुडाळ येथील वासुदेवानंद सभागृहात सायंकाळी ५ वाजता साजरा होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, शिंदे गटाचे आमदार शहाजी, बापू पाटील, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे आदी नेते मंडळी उपस्थित राहणार आहे.

यानिमित्ताने विद्यार्थी व विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या सन्माननीय व्यक्तींच्या गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी उशिरा गायक अजित कडकडे यांचा बहारदार कार्यक्रम, प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांचा पोवाडा कार्यक्रम, युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.