तळवडे बाजारपेठेत मटका स्वीकारताना एकावर कारवाई…

11
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी पोलिसात गुन्हा; २ हजार १४० रुपयांची रोकड जप्त…

सावंतवाडी ता. १५: तळवडे बाजारपेठेत मटका स्वीकारताना सावंतवाडी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. विष्णू महादेव साळगांवकर (रा. तळवडे-पेडणेकरवाडी), असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दोन हजार एकशे चाळीस रुपयाची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. दरम्यान याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महेश जाधव,दर्शन सावंत,अमित राऊळ यांनी केली.