सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी…

4
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.१८: आज सकाळी ८ वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे.  तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे ३७.२०० मीटर आहे. या नदीची इशारा पातळी ४१.६०० मीटर व धोका पातळी ४३.६०० मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ ४.२५० मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी  ९.९१० मीटर आणि धोका पातळी १०.९१० मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी २.००० मीटर इतकी असून इशारा
पातळी ८.५०० मीटर व धोका पातळी १०.५०० मीटर इतकी आहे. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग ६६ पूलाजवळ गडनदीची पातळी ३५.००० मीटर इतकी असून इशारापातळी ३६.७६४ मीटर व धोका पातळी ३७.९२० मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ ०.९०० मीटर इतकी असून इशारा पातळी ४.२६० मीटर व धोका पातळी ६.२६० मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.