संजू परब धन्यासाठी काही बोलू नका, शिवसेना नेत्यावर टिका करताना तारतम्य बाळगा…

9
2
Google search engine
Google search engine

चंद्रकांत कासारांचा पलटवार; अवैध धंद्यामागचा “गॉड फादर” जाहीर करण्यापासून कोणी रोखून धरले…

सावंतवाडी,ता.२०: आपल्या धन्यासाठी काहीही बोलणार्‍या संजू परब यांनी शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्यावर टिका करताना तारतम्य बाळगावे. असा प्रकार पुन्हा घडल्यास आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी दिला आहे. काही दिवसांपुर्वी शहरातील अवैध धंद्याचा “गॉड फादर” जाहीर करण्याचा इशारा देणार्‍या परबांनी माघार का घेतली? नावे जाहीर करण्यासाठी त्यांना कोणी रोखून धरले? असाही सवाल करीत इशारा देणारे श्री. परब उघड्याचा टोला त्यांनी लगावला आहेे. याबाबत श्री. कासार यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.

यात असे म्हटले आहे की, संजू परब यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांना जाहीर आवाहन केले होते. पोलीसांनी कारवाई करावी अन्यथा या मागचा “गॉडफादर”चे नाव जाहीर करणार आहोत, असे म्हटले होते. ते वाचनात आले त्यामुळे परब यांना अवैध धंदे करणाऱ्यांची नावे पोलीसांना देण्यासाठी कोणी रोखून धरले.” बोले तैसा चाले” असे परब यांनी प्रथम वागावे नंतर आमदार भास्कर जाधव यांच्या वर टीका करावी. आमदार जाधव यांच्या बाबतीत काहीच माहिती नसताना धन्यासाठी काहीही बोलल्यास शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

शिवसेनेचे नेते, आमदार भास्कर जाधव कष्टकरी शेतकरी आहेत. आजही ते चिखलात उतरून शेती करतात. अवैध धंदे करत असल्याची टीका करणाऱ्या संजू परब यांनी त्यांच्यावर एकतरी गुन्हा दाखल असल्याचे दाखवून द्यावे. परब यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांना जाहीर आवाहन करून या मागचा गॉडफादर कोण हे आपण सांगणार म्हटले होते. ते जाहीर न केल्यामुळे संजू परब जनते समोर उघडे पडले असल्याने नाहक टीका करुन दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहेत.