नरकासुर स्पर्धेत तेजस राणे, जागृत मित्रमंडळ प्रथम…

8
2
Google search engine
Google search engine

ठाकरे गट आणि युवा शिवसेनेतर्फे नरकासूर स्पर्धा…

कणकवली,ता.२४: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि युवा सेनेच्यावतीने कणकवलीत नरकासूर स्पर्धा झाली. यात कणकवलीतील तेजस राणे मित्रमंडळ आणि जागृत मित्रमंडळ या संघांनी संयुक्‍त विजेतेपद मिळविले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक महापुरुष मित्रमंडळ व पटकीदेवी

मित्रमंडळ यांना विभागून देण्यात आले. तर तृतीय क्रमांकाचेही पारितोषिक आंबेआळी मित्रमंडळ आणि भालचंद्र मित्रमंडळ या संघांना विभागून देण्यात आले. मधीलवाडी मित्रमंडळ, निम्मेवाडी मित्रमंडळ, सुदर्शन मित्रमंडळ, नवयुग मित्रमंडळा या संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. शहर परिसरातील १९ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने बाजारपेठेतील संदेश पारकर घरासमोर या नरकासुर स्पर्धा झाल्‍या. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तथा नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, तेजस राणे, वैभव मालंडकर, योगेश मुंज, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, युवा सेनेचे शहरप्रमुख आदित्य सापळे, सौरभ पारकर, महेश कोदे, साई कोदे, जय शेट्ये, यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

नरकासुर स्पर्धेत शहरातील विविध संघांनी आक्राळविक्राळ नरकासुर प्रतिकृती तयार केल्या होत्या. या प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेचे परीक्षण सुहास वरुणकर, प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले. स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.