ऐन दिवाळीत सुरू असलेली वीज तोडणी आणि बिलांची वसुली थांबवा…

7
2
Google search engine
Google search engine

शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मागणी; सावंतवाडीत विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट…

सावंतवाडी,ता.२८: ऐन दिवाळीत शहरासह तालुक्यात सुरू असलेले थकीत विद्युत ग्राहकांची वसुली आणि विज तोडणी तात्काळ थांबवा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडाने वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे. यात आमची कुचंबणा होत आहे. मात्र तरीसुद्धा दिवाळी काळात ही कारवाई थांबविण्याच्या सूचना मी कर्मचाऱ्यांना देतो, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

यावेळी यावेळी उपजिल्हा संघटन शब्बीर मणियार, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, राजा वाडकर, सतीश नार्वेकर, प्रवीण वाडकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी शहरासह तालुक्यात सध्या वीज ग्राहकांकडून बिलांची वसुली सुरू आहे. यावेळी वीस न भरणाऱ्यांना कनेक्शन होण्याची सक्त ताकीद दिली जात आहे. तर तशी कारवाई सुद्धा कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. ऐन दिवाळीत सुरू असलेला हा प्रकार सर्वसामान्यांना काळोखात ठेवणार आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने तरी दिवाळी काळात अशी कारवाई करू नका, असे उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. यावेळी वरिष्ठ स्तरावरून आम्हाला आदेश येत असल्यामुळे ती कारवाई सुरू आहे, मात्र तरीसुद्धा दिवाळीचे हे पंधरा दिवस आपण वसुली आणि वीज तोडणी थांबवण्याचा सूचना, कर्मचाऱ्यांना देतो, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी येथील नेवगी पाणंद परिसरात एक विद्युत पोल पूर्णता जीर्ण झाला आहे. तो बदलण्यासाठी वारंवार मागणी करून सुद्धा कोणतीही कार्यवाही अद्याप झाली नाही, त्यामुळे त्या ठिकाणी अनर्थ घडण्याआधी तो तात्काळ बदलावा, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागेल, असा इशाराही उपस्थितांनी दिला.