रांगणा-तुळसुली गावची ग्रामदेवता आई भावई देवीचा उद्या जत्रोत्सव…

2
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.१०: तालुक्यातील रांगणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या रांगणा-तुळसुली गावची ग्रामदेवता आई भावई देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या होणार आहे. यानिमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तरी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समिती आणि ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

आई भावई देवी नवसाला पावणारी म्हणून ओळखली जाते. तसेच ही देवी सहा गावची मर्यादा आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या या देवीच्या चरणी जत्रोत्सवानिमित अनेक भक्त लीन होतात.त्यामुळे या देवी ची महती दिवसेंदिवस सर्वदूर पोहोचली आहे. आई भावई देवीच्या जत्रोत्सवातील महत्वाचा क्षण म्हणजे रात्री १२:०० वाजता पालखी सोहळा आणि दुपारी १ वाजल्यापासून ओटी भरण्यास सुरुवात होते. भक्तगणांचा मनोकामना पूर्ण करणाऱ्या माऊली देवीचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला आहे. जत्रोत्सवात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. एस. टी. महामंडळाच्या बसेस आणि खाजगी वाहनातून हजारो भाविक गर्दी करतात. जत्रोत्सवाचे विलक्षण दृश्य पाहणाऱ्या भक्तांचे मन तृप्त होते. देवीच्या मंदिराचा झगमगाट आणि देवीचे सुखमय दर्शन डोळ्यात साठवून भाविक तृप्त होतात.

सर्व भाविकांनि आई भावई देवीच्या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रांगणा-तुळसुली गाव कमिटीने केले आहे.