मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या अधिवेशनास सुरूवात…

4
2
Google search engine
Google search engine

जेष्ठ पत्रकार कुमार केतकरांच्या हस्ते उद्घाटन; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची उपस्थिती…

पुणे,ता.१९: मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांच्याहस्ते झाले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, माजी अध्यक्ष गजानन नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, डीजीटल मिडिया सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, परिषदेचे विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हरिश्चंद्र पवार, माजी जिल्हाध्यक्ष विकास गांवकर, ब्रेकिंग मालवणीचे शुभम धुरी, कोकण दर्शनचे मिडियाचे आनंद धोंड, कोकणभूमिचे शैलेश मयेकर, दै. नवराष्टचे नरेंद्र देशपांडे, ओंकार गांवकर, पत्रकार परिषदेचे पदाधिकारी शरद पाबळे, आमदार अशोक पवार, अनिल बडगुले, सुनील लोणकर,अरुण कांबळे, प्रमोद भानगिरे, हेमंत जोगदेव, राजू पाटोकर, मिलिंद अष्टिवकर, मनसुर शेख, शोभा जयपुरकर, डिजिटल मीडिया अध्यक्ष अनिल वाघमारे आदी उपस्थित होते.