प्रथमेश तेली यांचा विवाह सोहळा गोव्यात थाटात संपन्न…

16
2
Google search engine
Google search engine

प्रमोद सावंत, रवींद चव्हाण, दानवे, प्रभूंची प्रमुख उपस्थिती…

सावंतवाडी,ता.२२: सिंधुदुर्ग भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांचे सुपुत्र प्रथमेश यांचा विवाह कोल्हापूर-चंदगड येथील गजानन पिळणकर यांची कन्या नम्रता हिच्याशी गोवा येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी खासदार निलेश राणे, गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ तानावडे, आमदार चंद्रकांत शेट्ये, माणिकराव कोकाटे, कल्याण काळे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, सुरेश नवले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. गोवा येथील “कोलवा बीच” वर हा सोहळा संपन्न झाला. तर २५ नोव्हेंबरला सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाजपाचे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह मित्रमंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तेली कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.

श्री. प्रथमेश तेली यांचा विवाह काल मोठ्या थाटात शाही पद्धतीने गोवा येथे संपन्न झाला. यावेळी सिंधुदुर्गसह गोव्यातील नेते मंडळी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. याप्रसंगी विवाह सोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी लक्षवेधी ठरली. या सोहळ्यात सिंधुदुर्ग-गोव्यातील भाजप नेते मंडळी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रथमेश यांचा परदेशातील मित्रपरिवार सुद्धा उपस्थित होता. दरम्यान २५ नोव्हेंबरला सावंतवाडी जिमखाना मैदानावर मोठ्या थाटात स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आकर्षक देखाव्यासह विविध मनोरंजनाचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तरी या सोहळ्याला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तेली कुटुंबीयांनी केले आहे.