मनसेची मालवणात २४ रोजी महत्त्वपूर्ण बैठक…

10
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २२ : तालुका मनसेची महत्वपूर्ण बैठक २४ नोव्हेंबर सकाळी १०.३० वाजता पंचायत समिती नजीकच्या हॉटेल विशाल येथे आयोजित करण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ३० नोव्हेंबर रोजी होत असलेला कोकण दौरा व आगामी ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी मालवण शहर व तालुक्यातील मनसे, मनवीसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे. असे आवाहन मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी केले आहे.