अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मातृत्व लादले….

6
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडीतील घटना; युवकाला अटक, प्रेम संबंधातून प्रकार…

सावंतवाडी ता. ०३: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मातृत्व लादल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार प्रेमसंबंधातून घडला आहे. संबंधित मुलगी ही तीन महिन्याची गर्भवती आहे. आज तिची तब्येत खालावल्याने ती डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली होती. यावेळी तपासणीनंतर हा प्रकार उघड झाला. दरम्यान डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसार संबंधित मुलीच्या नातेवाईकांना येथील पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संबंधित युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवती सोबत संशयित युवकाचे प्रेम संबंध होते. त्यातूनच हा प्रकार घडला आहे. संबंधित मुलीला आज अत्यवस्थ वाटू लागल्याने तिच्या नातेवाईकांनी येथील एका रुग्णालय दाखल केले होते. यावेळी तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती तीन महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नातेवाईकांनी सावंतवाडी पोलिसात तक्रार दिली. तर याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संशयित युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे, असे श्री. मेंगडे यांनी सांगितले.