रोणापाल‌ येथील दयासागर छात्रालयात अर्चना घारे यांचा वाढदिवस साजरा…

13
2
Google search engine
Google search engine

शिक्षक व मुलांनी दिल्या शुभेच्छा; अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून धान्य वाटप…

सावंतवाडी,ता.०४: रोणापाल‌ येथील ऑल इंडिया मूव्हमेंट फॉर सेवा चेन्नयीच्या दयासागर छात्रालयात राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान या निमित्ताने अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून या छात्रालयाला आवश्यक धान्य वाटप करण्यात आले.
२००७ साली सुरू झालेल्या या छात्रालय मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब आणि गरजू असे एकूण ३० मुले-मुली शिक्षण घेत आहेत. ज्यामध्ये १३ मुले आणि ७ मुली येथे निवासी राहून शिक्षण घेत आहेत. आजपर्यंत एकूण ३०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी या छात्रालयातून शिक्षण घेतले आहे. आणि यातील विद्यार्थी रेल्वे पोलिस, गोव्यातील नामवंत कंपनी तसेच डॉक्टर, इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान भविष्यात देखील या छात्रालयाला आवश्यक ती मदत केली जाईल, असे सौ. घारे यांनी आश्वासन दिले. यावेळी त्यांनी छात्रालयाचे वार्डन रत्नप्रभा केळुसकर,केअरटेकर वैदही परब आणि व्यवस्थापाक श्री.त्रिवबा विर यांचे विशेष आभार देखील मानले.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,महिला उद्योग व्यापार सेल जिल्हाध्यक्ष सौ.दर्शना बाबर-देसाई, शहराध्यक्ष देवा टेमकर,सूरज खान आणि मंगल कामत सोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.