धर्मराज महाराज यांचा शुक्रवारी कणकवलीत जयंती सोहळा…

17
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.७ : धर्मराज महाराज यांचा १०४ वा जयंती सोहळा शुक्रवारी ९ डिसेंबरला कणकवलीतील बाळगोपाळ हनुमान मंदिरात होणार आहे. यानिमित्ता दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी ९ रोजी सकाळी समाधीपूजन, लघुरूद्र, दुपारी आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी विविध मंडळांची भजने आणि रात्री दीपोत्‍सव आणि आरती असे कार्यक्रम होणार आहेत. या जयंती सोहळयाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बालगोपाळ हनुमान मंदीर, कांबळेगल्ली कणकवली यांच्यावतीने करण्यात आले आहे.