बांदा ग्रामपंचायतीत भाजपचे शामसुंदर मांजरेकर बिनविरोध.

3
2
Google search engine
Google search engine

बांदा ता. ०७: येथील ग्रामपंचायत निवडणूकित आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक ४ मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भरत गुरुदास धारगळकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने याठिकाणी भाजपचे शामसुंदर मांजरेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे मतदाना आधीच भाजपने बांदा ग्रामपंचायतीत विजयाचे खाते खोलले आहे.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये भरत गुरुदास धारगळकर आणि श्यामसुंदर मांजरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे याठिकाणी कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याबाबत औत्सुक्य निर्माण झाले होते. अखेर आज पक्ष हिताला प्राधान्य देत भरत धारगळकर यांनी उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतला. त्यामुळे मांजरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मांजरेकर हे या प्रभागात भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. यावेळी भाजप पदाधिकारी श्वेता कोरगावकर, सरपंच अक्रम खान, बाळू सावंत, बाबा काणेकर, प्रियांका नाईक यांनी श्री मांजरेकर यांचे अभिनंदन केले आहे.