बांद्यात मुसळधार अवकाळी पाऊस; आठवडा बाजारावर परिणाम…

8
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.१२:आज सायंकाळी बांदा शहर व परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. तब्बल एक तास पाऊस कोसळल्याने सोमवार आठवडा बाजारातील व्यापारी व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

आज सायंकाळी ४ वाजता पावसाला प्रारंभ झाला. तब्बल एक तास पाऊस कोसळला. आज बांदा शहराचा आठवडा बाजार असल्याने लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. शहरात मोठ्या संख्येने व्यापारी येतात. अचानक पाऊस कोसळल्याने व्यापारी व लोकांची एकच धावपळ झाली. आठवडा बाजार भरणाऱ्या आळवाडी मैदानात पाणीच पाणी झाल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले होते. अचानक पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले.