मसुरे येथील अंगणवाडी शिकणाऱ्या निधीला रंगभरण स्पर्धेत सुवर्णपदक…

4
2
Google search engine
Google search engine

राष्ट्रीय स्तरावर निवड; मुंबई-मुलुंडच्या “रंगोत्सव” संस्थेमार्फत स्पर्धेचे आयोजन…

मालवण,ता.२५: मसुरे येथील अंगणवाडीत शिकणाऱ्या निधी दीपक पेडणेकर या चिमुकलीने रंगभरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. दरम्यान आता तिची पुढील राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली. मुंबई-मुलुंड येथील रंगोत्सव संस्थेमार्फत “रंगोत्सव सेलिब्रेशन” या राष्ट्रीय स्तरावरील हस्ताक्षर, रंगभरण, टॅटू मेकिंग, कार्टून मेकिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याच स्पर्धेत निधी हिने यश मिळविले आहे.
निधी पेडणेकर हिला सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. निधी हिला विनोद कदम, अंगणवाडी शिक्षिका श्रीम. नंदा सावंत, अंगणवाडी सहाय्यक श्रीम.बागवे,केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती शर्वरी सावंत, गुरुनाथ ताम्हणकर, श्रीमती मगर, श्री. गावडे, उमेश खराबी, विनोद सातार्डेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आणि शाळेतील सर्व शिक्षक यांनीही तिला मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग राजेंद्र पराडकर, उद्योजक डॉक्टर दीपक परब, अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, उद्योजक दीपक सावंत, समाजसेवक नंदू परब, मर्डे सरपंच संदीप हडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, सौ सरोज परब, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, गायत्री ठाकूर, महेश बागवे, विलास मेस्त्री, उपसरपंच पिंट्या गावकर माजी उपसरपंच अशोक बागवे यांनी अभिनंदन केले आहे. निधी हिला आई ज्योती पेडणेकर, वडील दीपक पेडणेकर,वैभवी पेडणेकर, रेश्मा झुंजार पेडणेकर यांचेही मार्गदर्शन लाभले.