शेर्ले ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे दीपक नाईक बिनविरोध…

4
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.३०: शेर्ले ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे दीपक नाईक यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतवर भाजपचे वर्चस्व आहे. मावळते सरपंच उदय धुरी यांनी नूतन सरपंच प्रांजल जाधव व उपसरपंच नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळा शेर्लेकर, श्रावणी धुरी, श्रुती तारी, चैतन्या चांदेकर, श्यामराव सावंत, एकता शेर्लेकर, धोंडू किनळेकर,अनिषा शेर्लेकर तसेच माजी सरपंच जगन्नाथ धुरी, ग्रामस्थ आबा धुरी, राजू केरकर, अनंत बांदेकर, राजेश चव्हाण, भिकाजी धुरी, मोहन जाधव, बाबा धुरी, प्रशांत जाधव, अजित शेर्लेकर, संजय चांदेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.