सावंतवाडी बाजारपेठेतील भेलच्या दुकानाला आग, लाखाचे नुकसान…

4
2
Google search engine
Google search engine

मध्यरात्रीची घटना; बंब नसतानाही पालिकेेचे कर्मचारी नंदू गावकरांनी दाखवली तत्परता…

सावंतवाडी ता. ०१: येथील राणी पार्वती देवी हायस्कुलच्या समोर असलेल्या “न्यू-सावरीया कॉर्नर” या भेल सेंटरला आग लागून सुमारे लाखाचे नुकसान झाले. शॉर्ट सर्कीट मुळे हा प्रकार घडला असावा, असा संशय दुकान मालक अंकुश ठाकुर यांनी व्यक्त केला आहे. ही घटना काल रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान वेळीच आग विझविण्यास यश मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा हाहाकार उडाला असता. यावेळी आपला जीव धोक्यात घालून पालिकेचे बंबावरील कर्मचारी नंदू गावकर यांनी सतर्कता बाळगत दुकान उघडल्यामुळे सिलींडर बाजूला करून आग विझविण्यास यश आले.
त्यानंतर सर्व नागरीकांनी नळाच्या पाण्याच्या सहाय्याने आग विझविली. बिघाड झाल्यामुळे बंब उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पालिकेच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.
याबाबत अधिक माहीती अशी की, येथिल स्टेट बँकेला लागून सावरीया नावाचे भेल सेंटर आहे. त्या ठीकाणावरुन रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जाणारे आंबोलीचे हवालदार दत्ता देसाई यांना दुकानाच्या शटरच्या आत आग पेटताना दिसली. त्यांनी हा प्रकार तेथे जमलेल्या हेमंत पागंम, अजित मठकर, हेमंत रंकाळे आदींना सांगितला. त्यांनी तात्काळ पालिकेला संपर्क केला. परंतू त्यांचा बंब बिघाड झाल्यामुळे बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्या ठीकाणी जमलेल्या वल्लभ नेवगी, प्रथमेश आदींना सांगितले. तो पर्यत माहीती मिळाल्यानंतर पालिकेचे बंबावरील कर्मचारी नंदू गावकर त्या ठीकाणी धावत आले. त्यांनी तात्काळ कोणताही विचार न करता दुकानाबाहेर असलेले सर्व साहीत्य बाजूला करीत शटर फोडण्याचा निर्णय घेतला. परंतू तो पर्यत संबधित दुकान मालक ठाकुर हा त्या ठीकाणी चावी घेवून आला. यावेळी शटर उघडून पाहीले असता दुकानात पुर्णतः आग असल्याचे दिसून आले. त्यानंतर मिळेेल त्या साहीत्याने पाणी आणून आग विझविण्यात आली. यात आगीत ठाकुर यांचे फ्रीज, टेबल तसेच अन्य साहीत्य मिळून सुमारे लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर त्या ठीकाणी असलेल्या उद्योजक विनायक कोंडल्याळ यांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेेने तात्काळ बंबाची व्यवस्था करावी. आगीने रौद्र रुप धारण केले असते, तर मोठा अनर्थ घडला असता. बाजूची सर्व दुकाने जळली असती, अशी त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान त्या ठीकाणी उशिरा पोलिस उपनिरिक्षक गणेश कराडकर व त्यांचे सहकारी डुमिंग डिसोझा आदींनी भेट देत पाहणी केली.