बांदा नट वाचनालयात आयोजित निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

5
2
Google search engine
Google search engine

बांदा ,ता.०१: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सांगता समारंभाचे औचित्य साधून येथील नट वाचनालयात अंकुश रामचंद्र माजगांवकर पुरस्कृत कै. परशुराम लाडू नाईक व कै. लक्ष्मी परशुराम नाईक यांच्या स्मरणार्थ आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सहसेक्रेटरी हेमंत मोर्ये, संचालक निलेश मोरजकर, महिला सदस्या सौ. स्वप्निता सावंत, अंकुश माजगावकर, अनंत भाटे, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धा इ. ५ वी ते ७ वी व इ. ८ वी ते १० वी अशा दोन गटात घेण्यात आल्या. या स्पर्धेत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी सन २०२१-२२ मध्ये संपन्न झालेल्या निबंध लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. सदर स्पर्धा इ. ५ वी ते ७ वी व इ. ८ वी ते १० वी अशा दोन गटात घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. पाचवी ते सातवी गटात वैष्णवी गणपत देसाई प्रथम क्रमांक, गायत्री विवेकानंद केसरकर – द्वितीय, खुशी मंगेश पेडणेकर तृतीय क्रमांक, तर कु. सई स्वागत नाटेकर हीला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. आठवी ते दहावी गटात आर्या अजय देसाई – प्रथम क्रमांक, सानिका श्रीराम देसाई – द्वितीय, गौरी अभय देसाई तृतीय क्रमांक, लावण्य भगवान घडी हीला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.

सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनी, वाचक, शिक्षक, पालक, ग्रंथपाल सुस्मिता नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जे. डी. पाटील यांनी केले.