एरव्ही फडणवीसांसोबत असणारे आता मुख्यमंत्र्यांसोबत कसे…?

41
2
Google search engine
Google search engine

विनायक राऊत; केसरकरांचा फुगा सावंतवाडीकर नक्कीच फोडतील…

सावंतवाडी/भुवन नाईक,ता.०४: शिवसेनेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे पुढे फिरणारे दीपक केसरकर आता एकनाथ शिंदें सोबत कसे? यामागे नेमके गणित काय? फडणवीस यांच्यावरील त्यांची निष्ठा संपली की काय? असाच सवाल आज येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. प्रथमता शरद पवार त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह सावंतवाडीतील मतदारांशी बेईमानी करणाऱ्या दीपक केसरकर यांच्या भ्रमाचा फुगा सावंतवाडी मतदारसंघातील जनता येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच फोडेल,असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या माध्यमातून सावंतवाडीत आज नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बाळा गावडे, संजय पडते, जान्हवी सावंत, शैलेश परब, चंद्रकांत कासार, मायकल डिसोजा, योगेश नाईक, आबा सावंत, रुपेश राऊळ, गुणाजी गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी राऊत पुढे म्हणाले की, सावंतवाडीत गेली कित्येक वर्ष रुग्णव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे अशा दुरवस्थेमुळे सावंतवाडी तालुक्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रुग्णांचा त्रास कमी करण्याची जबाबदारी ही तुमच्याकडे आहे, असे मला ओटवणेचे सरपंच दाजी गावकर यांनी सांगितले आहे. मात्र रुग्णालयाचा प्रश्न आम्ही यापूर्वीच घेतला होता. येथील आमदार दीपक केसरकर यांनी ते मंजूर करून घेतलं हे सुद्धा खरं आहे मात्र त्यांनी ते मंजूर करून सडवलं हे सुद्धा तेवढेच खरे आहे. मल्टी स्पेशालिटी मंजूर झाल्यानंतर आम्ही जागा बघत होतो मात्र त्याचवेळी व्यत्य ग्रामपंचायत देणे आपल्या जागा सरकारला फुकट देतो मात्र महामार्गा नजिक हे रुग्णालय होऊ दे असे सांगितले मात्र त्यावेळी आम्ही ती जागा निश्चित सुद्धा केली तर राऊत आपल्या अधिकारावर अतिक्रमण करतात अशी सुद्धा तक्रार श्री केसरकर यांनी केली. आणि त्यावेळी ती जागा आम्ही मान्य केली सरकारने सुद्धा मान्य केली होती मात्र केसरकर यांनी खोडा घातला.आणि त्यावेळी हॉस्पिटल झाले नाही तरी चालेल पण व्यक्तीची जागा नको अशी भूमिका केसरकर यांनी घेतली त्यामुळे आजपर्यंत तो प्रश्न रेंगाळत राहिला आहे. आणि दोन वर्षांपूर्वीच व्यक्ती येते मल्टीस्पेशालिटी कामाला भूमिपूजन करून सुरुवात केली असती तर आज निश्चितच सुसज्ज असे हॉस्पिटल साकार झाले असते. सावंतवाडी तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला याचा फायदा होणार होता मात्र घोषणा पलीकडे काय करायचेच नाही असे केसरकर यांचे झाले आहे.जिल्ह्यातील एक लाख लोकांना सप्टेंबर बॉक्स देणार असे श्री केसरकर यांनी सांगितले होते त्यावेळी मी सांगितले की अगोदर तुमच्या मतदार संघात ते द्या आणि नंतर जिल्ह्यात वाटप करा मात्र घोषणांक अलीकडे आणि आश्वासनानपलीकडे श्री केसरकर यांनी काहीच केले नाहीयेणाऱ्या काळात सावंतवाडी विधानसभा निवडणुकी उद्धव साहेबांचा भगवा झेंडा फडकविण्याचा जो तुम्ही निर्धार केला आहे त्यासाठी जुन्या जाणत्यांचा आशीर्वाद घेऊन कामाला लागा मी तुमच्या सदैव पाठीशी आहे लागेल ती मदत मी निश्चितच करणार असे आश्वासन त्यांनी दिले
श्री राऊत पुढे म्हणाले कालपासून भारतीय जनता पक्षाची घसरण चालू झाली आहे विधान परिषदेत निवडणुकीमध्ये पाच पैकी चार जागा या महाविकास आघाडी च्या आहेत मात्र शिवसेनेकडे पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या नंदुरबार सारख्या जिल्ह्यामधून शुभांगी पाटील या मताधिकाने निवडून आल्या. मात्र अवघ्या पंधरा दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून दिले.आज पर्यंत भराडी देवी यात्रेचा कोणी राजकीय फायद्यासाठी वापर केला नव्हता. सर्व पक्षाचे मंडळी त्या ठिकाणी जातात नतमस्तक होतात आशीर्वाद घेतात मात्र त्या जत्रे दिवशी पक्षीय सभा घ्यायची आणि जत्रेला येणाऱ्या लोकांना पक्षाच्या सभेला बसवायचे हा धंदा प्रथमच भारतीय जनता पक्षाने चालू केला आहे त्यामुळे मला खात्री आहे सिंधुदुर्गची काशी म्हणून जिला ओळखले जाते त्या भराडी मातेच्या दरबारा राजकीय मंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षाने केला तर भराडी माता त्याला मुळीच प्रसन्न होणार नाही उलट त्यांना सांगेल की आता बस झाले.
श्री. पडते म्हणाले, सावंतवाडी तालुक्यातील शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात निवडणूक लढवली. त्यामुळे पराभूत झालेल्या आणि विजयी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो जे पराभूत झाले त्यांनी आपल्याला किती मते मिळाली याचा विचार करून त्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गावातील लोकांसाठी काम करा अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे आज जरी तुम्ही अपयशी झाला तरी येणाऱ्या निवडणुकीत तुमचा विजय निश्चित आहे. आणि जे विजयी झाले आहेत त्यांनी सगळ्यांना एकत्रित करून गावाचा विकास करावा गावागावात सरकारच्या असलेल्या योजना पोहोचवा सर्व सामान्यांचे काम करा आम्ही तुमच्या बरोबर आहोत. या ठिकाणी काहीजण शिवसेना संपली त्यांना आता निधी कोण देणार? अशी विधाने करीत आहेत. मात्र तुम्ही याला बळी पडून आणि डगमगून न जाता गावातील कामांसाठी लागणारे प्रस्ताव तयार करा. त्यासाठी लागणारे निधी खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेचे पदाधिकारी नक्कीच देतील ,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचाच आमदार होणार आहे. या ठिकाणी शिवसेनेची ५० हजार पेक्षा जास्त मते आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी डगमगून न जाता काम केले पाहिजे, असे किती केसरकर येतील आणि किती जातील याचा फरक काहीही शिवसेनेला पडणार नाही. जोपर्यंत उद्धव ठाकरे आमच्या पाठीशी आहेत तोपर्यंत आमचं कोणीही काही करू शकत नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.