सावंतवाडी रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून द्या…

6
2
Google search engine
Google search engine

सामाजिक बांधिलकीची मागणी; विविध त्रुटी दूर करण्यासाठी वेधले लक्ष…

सावंतवाडी,ता.१५: येथील उपजिल्हा रुग्णालयातील विविध त्रुटी सुधारा तसेच गोरगरीब रुग्णांना फायदा व्हावा यासाठी सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून द्या, अशी मागणी सामाजिक बांधिलकी संस्थेच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे करण्यात आली. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक बी. एस. नागरगोजे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रुग्णालयातील अडीअडचणी दूर करण्यासाठी आपण सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन श्री. नागरगोजे यांनी यावेळी दिले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी रवी जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी हे निवेदन दिले.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सामाजिक बांधिलकी द्वारे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. बी एस नागरगोजे यांना निवेदन देण्यात आले. सामाजिक बांधिलकीची प्रथम मागणी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून द्यावी त्याचा फायदा सर्वसामान्यांपासून गोरगरीब पेशंटला होऊ शकेल या मागणीला सिव्हिल सर्जन डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी सोनोग्राफी मशीन व टेक्निशियनही लवकरच उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये निराधार व गोरगरीब पेशंट तसेच हॉस्पिटलसाठी रुग्णपयोगी उपकरणे रुग्णांच्या सेवेसाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पुरवली जातात.

हॉस्पिटल व रुग्णांच्या सेवेसाठी जीवन रक्षा प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजू मसुरकर व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव सतत रुग्णालयाच्या संपर्कामध्ये असल्याकारणाने हॉस्पिटलमध्ये काही गंभीर समस्या निदर्शनास येतात. त्यातील सर्वात महत्त्वाची गंभीर बाब म्हणजे अपघात विभागाच्या परिसरामध्ये पेशंटचे नातेवाईक टू व्हीलर-फोर व्हीलर पार्क करून जातात त्याचा परिणाम सिरीयस पेशंट हॉस्पिटलमध्ये घेऊन येताना मध्येच,पार्क केलेल्या वाहनांचा ॲम्बुलन्सला अडथळा होतो त्यामुळे, ॲम्बुलन्सला काही काळ रस्त्यावरच थांबावं लागतं. त्यासाठी पार्किंगच्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड नेमावा अशी सामाजिक बांधिलकीची दुसरी मागणी होती.

तपासणीनंतर पेशंटला औषध गोळ्या लिहून दिल्या जातात.परंतु;औषध भंडारामध्ये नेहमीच औषधांचा तुटवडा असल्याकारणाने महागडी औषधे सर्वसामान्य गोरगरीब पेशंटला बाहेरून घ्यावी लागतात जी त्यांना परवडत नाही. त्याकरिता योग्यरित्या औषधांचा पुरवठा व्हावा अशी तिसरी मागणी होती.

ओपीडी चा टाईम हा सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत असल्याकारणाने ग्रामीण भागातून येणाऱ्या पेशंटची गैरसोय होते, तो टाईम वाढवून सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत करावा अशी चौथी मागणी होती. हॉस्पिटल शतागृहामधील लिकेज असलेले नळ व फुटलेले टॉयलेट ताबडतोब बदलण्यात यावे अशी पाचवी मागणी होती.

हॉस्पिटल परिसरामध्ये सीसीटीव्ही लावण्यात यावा अशी सहावी मागणी होती.

पेशंटला गरम व शुद्ध पाणी मिळण्यासाठी, हॉस्पिटल परिसरामध्ये वॉटर फिल्टर मशीन बसवावी.

हॉस्पिटलमध्ये असलेले दोन जनरेटर यांचा मेंटेनन्स व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यातील ऑइल वेळच्या वेळी बदलावे जेणेकरून जनरेटरची कार्यक्षमता वाढू शकेल.

अशा प्रकारच्या सर्व मागण्यांबाबत जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ.बी एस नागरगोजे यांना भेटून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

सामाजिक बांधिलकीच्या या निवेदनाचे गांभीर्यपूर्वक विचार करून डॉ.नागरगोजे यांनी या सर्व मागण्यांना ताबडतोब मंजुरी दिली. यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनीही पाठपुरावा केला. सामाजिक बांधिलकीच्या मागण्यांना तात्काळ मंजुरी दिल्याबद्दल सामाजिक बदलीच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल परुळेकर ,रवी जाधव, संजय पेडणेकर, समीरा खलील, एडवोकेट अशोक पेडणेकर, हेलन निबरे, प्रा.सतीश बागवे, प्रा.शैलेश नाईक, प्रा. प्रसाद कोदे, श्याम हळदणकर, शेखर सुभेदार या सर्वांनी त्यांचे खूप खूप आभार मानले.

याप्रसंगी सिव्हिल सर्जन डॉ. बी एस नागरगोजे , सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.दुर्भाटकर ,जिल्हा रुग्णालयाचे डॉ. सुबोध इंगळे , डॉ. संदीप सावंत , राजू मसुरकर व रवी जाधव उपस्थित होते.