पत्रकार संरक्षण समितीची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर…

13
2
Google search engine
Google search engine

अध्यक्षपदी प्रसाद मडगांवकर; तर सचिवपदी शैलेश मयेकर…

सावंतवाडी ता. १८: महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात अध्यक्ष पदी प्रसाद मडगांवकर, तर सचिवपदी शैलेश मयेकर यांची निवड झाली आहे. याबाबत समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी नियुक्तीपत्र प्रदान केली.
पत्रकार संरक्षण समिती जिल्हा कार्यकारिणी च्या खजिनदारपदी वासुदेव उर्फ नयनेश गावडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय सखाराम पिळणकर, जिल्हा संघटक जाफर शेख, सहसचिव यशवंत कृष्णा माधव तर सह खजिनदार पदी मदन शंकर मुरकर यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या २९ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या,शहरी व ग्रामीण पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्यांना न्याय देणाऱ्या पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी दूरध्वनीवरून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गच्या सर्व सभासद पदाधिकाऱ्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.